टॉप 10 सुपरहिट भारतीय चित्रपट 2023 ( Top 10 Super Hit Indian Movies of 2023 box office collection )

टॉप 10 सुपरहिट भारतीय चित्रपट  2023

( Top 10 Super Hit Indian Movies of 2023 )

indian movies 2023 box office collection


Top 10 Super Hit Indian Movies of 2023


दरवर्षी नवनवीन दमदार चित्रपट देण्याची परंपरा असलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीत 2023 या वर्षी सुद्धा अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आणि त्यातील   अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली. पण 2023 या वर्षात ज्या ( Super Hit indian movies 2023 box office collection )

चित्रपटानी बॉक्स ऑफिस गाजवलं , दर्शकांच्या सर्वात जास्त पसंतीला उतरले. अशा दहा चित्रपटांचा आढावा

 ( Super Hit indian movies 2023 box office collection ) आपण या छोट्याशा लेखातून घेणार आहोत.

Ranveer Singh,Alia Bhatt-Rocky Aur Rani kii Prem Kahaani

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’

 हा हिंदी भाषेतून निर्माण झालेल्या चित्रपट करण जोहर यांनी दिग्दर्शित केलेलाआहे. निर्मिती आणि मार्केटिंग  यासाठी सुमारे १७८ कोटी रुपये खर्च आला. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन आणि  वायकॉम 18 स्टूडियोज यांची आहे. तसेच या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे प्रमुख कलाकार असून धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आज़मी, चूर्णी गांगुली, आमिर बशीर, तोता रॉय चौधरी, आणि  क्षिति जोग असे सहकलाकार आहेत या चित्रपटाने  सुमारे 350 कोटी रुपये पेक्षा जास्त कमाई केली. उत्पन्नाच्या दृष्टीने ( Super Hit indian movies 2023 box office collection ) हा चित्रपट दहाव्या क्रमांकावर राहिला.

 डंकी’ Dunki

हिंदी भाषेतून तयार झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल,बोमन इराणी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 423 कोटी रुपये पेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटाचा निर्मितीसाठी 120 कोटी रुपये खर्च आला. रेड चिलीज एंटरटेनमेंट, जिओ स्टुडिओ आणि राजकुमार हिरानी फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उत्पन्नाच्या दृष्टीने हा चित्रपट नव्या क्रमांकावर राहिला. 

टाइगर 3 - Tiger 3

 सलमान खान कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांची प्रमुख भूमिका असलेला हा 2023 मध्ये आलेला ॲक्शन  थ्रिलर हिंदी चित्रपट तीनशे कोटीमध्ये तयार  झाला याची निर्मिती यशराज फिल्म बॅनरची आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलेलं असून  या चित्रपटाने सुमारे 467 कोटी रुपये कमाई केली व तो उत्पन्नाच्या यादीत आठव्या क्रमांकावर राहिला. 

Leo लियो: ब्लडी स्वीट

 तामिळ भाषेत बनलेला ॲक्शन थ्रिलर चित्रपट.  लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केला आहे. यातील प्रमुख कलाकार आहेत विजय, तृषा ,संजय दत्त आणि अर्जुन. 250 ते 300 कोटी रुपयात तयार झालेल्या या चित्रपटाने  सुमारे 595 कोटी रुपये कमावलेआणि हा चित्रपट सातव्या क्रमांकावर राहिला.

जेलर  Jailer

 हा रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित  2023 मधील तमिळ-भाषेतील ॲक्शन थरारपट आहे.  605 कोटी रुपये पेक्षा जास्त कमाई केली उत्पन्नाच्या ( Super Hit indian movies 2023 box office collection ) यादीत सहाव्या क्रमांकावर राहिला. 

सलार पार्ट 1 – सीजफायर (Salaar: Part 1 – Ceasefire

 प्रभास, पृथ्वीराज ज़ुकुमारन, श्रुति हासन  यांच्या प्रमुख भूमिका असलेला तेलगू सोबतच कन्नड भाषेत तयार झालेला  ॲक्शन चित्रपट. या चित्रपटाने जगभरात सुमारे 560 कोटी रुपये पेक्षा जास्त कमावले. उत्पन्नाच्या दृष्टीने हा चित्रपट ५ व्या क्रमांकावर राहिला.

गदर २ (Gadar 2 ) 

 सनी देओल, अमीशा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांचा प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट उत्पन्नाच्या दृष्टीने  ( Super Hit indian movies 2023 box office collection ) चौथ्या क्रमांकावर राहिला या चित्रपटाने सुमारे 692 कोटी रुपयांची कमाई केली. हिंदी-भाषेत  बनवलेला अनिल शर्मा दिग्दर्शित आणि निर्मित अ‍ॅक्शन नाट्यपट आहे.

एनिमल Animal (2023 film)

रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना आणि  तृप्ति डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा संदीप रेड्डी दिग्दर्शित हिंदी चित्रपट उत्पन्नाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला या चित्रपटाने सुमारे 897 कोटी रुपयांची कमाई केली हा चित्रपट इतरही भारतीय भाषांत डब करून प्रदर्शित करण्यात आला होता. भूषण कुमार,कृष्ण कुमार (अभिनेता), मुराद खेतानी,अश्विन वर्दे, प्रणय रेड्डी वांगा, संदीप रेड्डी वांगा  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

पठाण Pathaan

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट  ( Super Hit indian movies 2023 box office collection ) उत्पन्नाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला ज्याने सुमारे 1050 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट 240 कोटी रुपयांमध्ये तयार झाला. सिद्धार्थ आनंद लिखित आणि दिग्दर्शित हिंदी  चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे..

आणि ( Super Hit Indian films of 2023 ) पहिल्या क्रमांकावर आहे…

जवान Jawan 

Nayanthara in Jawan Movie


हा हिंदी भाषेतील ॲक्शन थरारपट भारतीय चित्रपट सृष्टीतील 2023 या वर्षातील सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आणि उत्पन्नाचा यादीत  ( Super Hit indian movies 2023 box office collection ) पहिला क्रमांकावर राहिला. या चित्रपटात शाहरुख खान पिता आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत असून, नयनतारा, विजय सेतुपती हे प्रमुख कलाकार कलाकार आहेत तसेच दीपिका पडुकोण त्यांची विशेष उपस्थिती असून प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचा दिग्दर्शन ऍटली यांनी केलेलं असून ऍटली यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. अरुण कुमार हे विशेषता तामिळ भाषेतील पटकथा लेखक निर्माता आणि दिग्दर्शक आहेत जे ऍटली या नावाने दिग्दर्शन करतात. 

रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून तीनशे कोटी रुपयात तयार झालेल्या या चित्रपटाने  जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 1150 कोटी  रुपये पेक्षा जास्तव्यवसाय केला.

या छोटासा लेखातून भारतीय चित्रपट सृष्टीतील २०२३ मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट दहा चित्रपटांचा ( Super Hit Indian films of 2023 ) थोडक्यात आढावा घेण्यात आलेला आहे. (लेखात दिलेली माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे)

काही चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रसारित झालेले आहेत त्यामुळे उत्पन्नाच्या आकडेवारी मध्ये काही प्रमाणात फरक पडू शकतो याची वाचकांनी नोंद घ्यावी. माहिती आवडली असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि अधिक लिहिण्यासाठी मला प्रेरित करा. धन्यवाद! 

                                                                                                                                              - प्रसाद

Post a Comment

0 Comments